रावेर : प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील विवरा येथे घरात घुसून हातात विडा घेऊन फिर्यादील महिला व तिच्या पतीला मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली असून याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील विवर येथील संशयित मंगेश पाटील याने भिंतीच्या बांधकामाच्या कारणावरून फिर्यादी भाग्यश्री विकास पाटील वय २८ हिच्या घरात घुसून हातात विळा घेऊन बांधकामाच्या कारणावरून तिचे पती विकास पाटील यांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना 23 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भाग्यश्री पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावर संशयित मंगेश पुरुषोत्तम पाटील राहणार विवरा बुद्रुक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजेंद्र पाटील करीत आहे.


