Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बांगलादेशात भरलेली बस पडली तलावात ; 17 जणांचा मृत्यू !
    क्राईम

    बांगलादेशात भरलेली बस पडली तलावात ; 17 जणांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशभर पावसाचे थैमान सुरु असतांना बांगलादेशात बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात प्रवाशांनी भरलेली बस तलावात पडल्याने तीन मुलांसह 17 जणांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत.

    वृत्तसंस्था एएनआयने बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. रिपोर्टनुसार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. या अपघातात बचावलेल्यांनी बस चालकाला दोषी ठरवत बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले. डेली स्टारच्या मते, 52 लोकांची क्षमता असलेल्या बसमध्ये 60 हून अधिक लोक होते. पिरोजपूर येथील भंडारिया येथून सकाळी 9 वाजता निघालेली बस बारिशाल-खुलना महामार्गावरील छत्रकांडा येथे सकाळी 10 वाजताच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात पडली.

    बारिशालचे विभागीय आयुक्त एमडी शौकत अली यांनी सांगितले की, अपघातात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील बहुतेक बळी पिरोजपूरच्या भंडारिया उपजिल्हा आणि झलकाठीच्या राजापूर भागातील रहिवासी आहेत. देशात बसचे अपघात होणे नवीन नसून रोड सेफ्टी फाउंडेशन (RSF) च्या मते, एकट्या जून महिन्यात एकूण 559 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 562 लोकांचा मृत्यू झाला आणि 812 लोक जखमी झाले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.