Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेरात एकाचा विहिरीत तर दुसऱ्याचा खदानीत आढळला मृतदेह
    अमळनेर

    अमळनेरात एकाचा विहिरीत तर दुसऱ्याचा खदानीत आढळला मृतदेह

    editor deskBy editor deskJuly 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    तालुक्यातील दोन जणांचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. रढावन येथे एकाचा विहिरीत तर दुसऱ्याचा खदानीत मृतदेह आढळून आला. यात नितीन अंबादास मराठे (४२, रा. मुसळी ता. धरणगाव, ह.मु. रढावण- राजोरे) आणि देवा धाकू पारधी (४०, रा. ताडेपुरा, अमळनेर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, नितीन हा भाऊ शरद, आईसोबत बुधवारी शेतात काम करत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाऊ घरी जायला निघाला असता, नितीन याने आपण नंतर येत असल्याचे सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचे मामा राजेंद्र चिंतामण काळे यांच्या शेतातील विहिरीत नितीनचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत अमळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेकॉ. हितेश चिंचोरे करीत आहेत. दुसरी घटना चोपडा रोडवर खदानीत घडली. ताडेपुरा येथील देवा पारधी हा मजुरी करत होता. दोन दिवसांपूर्वी तो कामाला गेला, परंतु घरी परतला नाही. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवळी शिवारातील खदानीत देवा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या आतेभावाने खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेकॉ सुनील पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.