Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एटीएसच्या चौकशीनंतर सीमाने केले धक्कादायक खुलासा !
    क्राईम

    एटीएसच्या चौकशीनंतर सीमाने केले धक्कादायक खुलासा !

    editor deskBy editor deskJuly 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील अनेक नागरिकांना ‘गदर’ चित्रपटाची आठवण करून देणारी स्टोरी सध्या देशात घडू लागली असल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. पण पोलीस यंत्रणा ज्या प्रकारे तपास करीत आहे. त्याप्रमाणे हि स्टोरी कुठलीही लव्ह स्टोरी असल्याचे कुठलेही संकेत देत नाही. हि स्टोरी सीमा हैदर भारत आली कशी व का आली यासाठी एटीएसने तिची चौकशी केली असून सीमासोबत तिचा पती सचिन आणि सासरे नेत्रपाल यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तीन दिवसांच्या चौकशीमध्ये सीमाबाबत अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. कारण काही तशी कारणे त्यातील सर्वात मुख्य म्हणजे सीमाच्या ओळखपत्रावर तिचं वय हे 21 दाखवण्यात आलं होतं मात्र तिने वय 27 सांगितलं होतं. त्यामुळ ती गुप्तहेर असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. परंतू तिने चौकशीनंतर सर्व काही स्पष्टपणे सांगून टाकलं आहे.

    पाकिस्तानमधून येण्यासाठी मी माझं घर विकून पैसे जमवले होते. त्यानंतर यू ट्यूब भारतात कसं जाता येईल याची माहिती घेतली. पाकिस्तानमधून मी शारजाहला गेले तिथून नेपाळ आणि ग्रेटर नोएडा असा प्रवसा केला. आता मी पाकिस्तानला जाऊ शकत नाही. कारण तिथे गेले तर माझ्या जिवाला धोका आहे. माझा भाऊ मजूरीचं काम करत होता आणि गेल्या वर्षी तो सैन्याकत भरती झाला असून तो साधा हवालदार आहे. इतकं सर्व काही सांगूनही जर मला देशाचा कायदे जे काही करायला सांगेल ते करायला मी तयार असल्याचं सीमा हैदरने सांगितलं आहे. दरम्यान, आता मी आधी हिंदू आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये परत पाठवलं तर माझ्या जिवाला धोका आहे. मी माझ्या प्रेमासाठी भारतात आले असून सचिनवर माझं प्रेम आहे. जर मी दोषी आढळले तर मला हवी ती शिक्षा करा मला ती मान्य असेल. सरकार मला डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवू शकतं, मी पण तिथे राहायला तयार आहे पण मुलांना आणि सचिनलासुद्धा तिथे ठेवावं, असं सीमा हैदर म्हणाली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.