मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काही भागात पावसाचा मोठा हाहाकार असतांना रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या दुर्घटननेनंतर येथील दुर्घटनाग्रस्त मुलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. या मुलांचं पालकत्व शिंदे स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे या आज इर्शाळवाडी येथे जाऊन या मुलांचं पालकत्व स्वीकारण्याची माहिती दिली.
नीलम गोऱ्हे या इर्शाळवाडीत जाऊन दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण निर्वासित झाले आहेत. तसेच दुर्घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अजून ८६ जण अडकल्याची माहिती मिळत आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन इर्शाळवाडीतील मुलांची जबाबदारी घेण्यात येणार आहे. मुलांचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत फाऊंडेशन सहकार्य करेल. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून येथील नागरिकांना घरे बांधून देण्याचे सांगितले आहे.