मुंबई : वृत्तसंस्था
देशात बदलत्या हवामानामुळे राज्यातील पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने कोकणात पावसाचाह कहर सुरु असून यात रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील अनके परिवार जमिनीखाली अडकले असून गेल्या तीन दिवसापासून येथे शोधकार्य सुरु आहे. या ठिकाणी आज ठाकरे गटाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेट देणार असल्याची बातमी समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यातील इशाळवाडीतील नुकसानग्रस्त परिसराची ते पाहणी करतील. तसेच स्थानिकांशी चर्चा करणार आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यावेळी त्यांच्यासोबत असतील. या आधी आमदार आदित्य ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर बचाव कार्य अजूनही सुरू आहे. येथील मृतांची संख्या आता 22 झाली असून अजूनही 102 नागरिकांचा शोध लागलेला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त वाडीला भेट देणार आहेत. इरशाळवाडी जवळील पंचायत मंदिर नढाळ पासून पाच किलोमीटर वर बचावलेल्या ग्रामस्थांना ठेवण्यात आले आहे. तिथे पहिले उद्धव ठाकरे जाणार आहेत.