• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘त्या’ मृत्यू प्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल !

अमळनेर पोलिसांना तफावत आढळताच केली कारवाई

editor desk by editor desk
July 22, 2023
in अमळनेर, क्राईम
0
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !

अमळनेर : प्रतिनिधी 

अमळनेर शहरातील एका हॉटेल मालकाने वेटरच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून खून केला. ही घटना तब्बल तीन महिन्यांनी उघडकीस आली आहे. सुरत रुग्णालयातील पंचनामा आणि आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर हा गुन्ह्याची उकल झाली. पोलिसांनी आरोपी हॉटेल मालक नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी (वय ३५) रा. माळीवाडा याला ताब्यात घेतले. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  नरेंद्र चौधरी याची अमळनेर परिसरातच साई व रूपाली हॉटेल आहे. दगडू पाटील हा तेथे वेटर होता. दगडू गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून येथे काम करीत होता. हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने दि. २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलिस स्टेशनला माहिती दिली की, सकाळी सहा वाजता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने खासगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे उपचारासाठी नेण्यात आले. दि. ६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता. अमळनेर पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, सुरत येथील शवविच्छेदन अहवाल आणि नरेंद्र चौधरी याने दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर व पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी घटनास्थळाजवळील फुटेज तपासले. त्यात दि. २२ रोजी पहाटे नरेंद्र चौधरी हा वेटर दगडू याला मारहाण करीत होता. दगडू खाली पडल्यावर लोखंडी वस्तू उचलून दगडूच्या डोक्यावर तीन वार केले. डोक्यात दगडही मारला आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून गेला. पोलिस कर्मचारी घनश्याम पवार याच्या फिर्यादीवरून, नरेंद्र चौधरी (वय ३५ रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

Previous Post

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची बदली

Next Post

माझे परिवार जमिनीखाली ; नातेवाईकांनी फोडला टाहो !

Next Post
माझे परिवार जमिनीखाली ; नातेवाईकांनी फोडला टाहो !

माझे परिवार जमिनीखाली ; नातेवाईकांनी फोडला टाहो !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group