जळगाव : प्रतिनिधी
भुसावळ शहरातील बाजार पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना षडयंत्र अॅन्टीकरप्शनच्या खोट्या गुन्हयामध्ये अडकवुन अटक करविले प्रकरणी निपक्षपणे चौकशी होवुन न्याय मिळणेबाबत आज काही समाजसेवकांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, वरील विषयास अनुसरुन आम्ही खालील सही करणार भुसावळ शहरातील सामान्य नागरीक नम्रपणे निवेदन करतो की, पोलीस निरीक्षक श्री राहुल बाबासाहेब गायकवाड हे गेल्या दिड वर्षापासुन भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणुन कार्यरत होते. त्यांचे कार्यकाळामध्ये त्यांनी भुसावळ शहरातील अनेक गुन्हेगारांवर मोक्का, एम. पी.डी.ए सारख्या कायद्याखाली कठोर कारवाया करुन गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवलेले होते. त्यांच्या प्रभावी व आक्रमक कार्यशैलीमुळे गुन्हेगारांवर चांगला वचक निर्माण झाल्याने शहरातील गुन्हयाचे प्रमाण देखील कमी झाले होते. तसेच भुसावळ शहरातील पोलीससांबाबत सर्वसामन्य जनता व्यापारी वर्ग यांच्यामध्ये कायद्यावरचा विश्वास वाढुन सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्या कामाच्या पध्दतीमुळे काही समाजकंटक व सराईत गुन्हेगार खोटया तक्रारी करुन त्यांना अडचणीत आणण्याचा व त्यांची बदली करण्याचा प्रयत्न करीत होते. याच षडयंत्रांचा भाग म्हणुन दिनांक – 18/07/2023 रोजी श्री राहुल गायकवाड यांना गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या खाजगी इसमाचा वापर करुन अॅन्टीकरप्शनच्या प्रकरणात अडकवून खोटी कारवाई करण्यात आली आहे..
सदर कारवाईमुळे भुसावळ शहरातील कायदाप्रेमी जनतेमध्ये तिव्र असंतोष निर्माण झालेला आहे. पोलीस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांचेवर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्या-या नागरीकांना भुसावळ शहरातील गुन्हेगारांकडुन सध्यास्थितीत धमक्या मिळत आहेत. तसेच त्यांचेवर वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टरांच्या कुटुंबास जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. तसेच काही पोलीस कुटुंबियांना देखिल धमकवि जात आहे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांचे विरुद्ध कोणताही पुरावा नसतांना त्यांना अॅन्टी करप्शन विभागाकडुन खोटया गुन्हयात गोवण्यात आल्याची चर्चा भुसावळ शहरातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये आहे. तसेच काही गुन्हेगार आम्ही 4 लाख रुपये खर्च करुन मलकापुर बुलढाणा येथील लोकांना हाताशी धरत राहुल गायकवाड यांना अॅन्टीकरप्शनच्या गुन्हयात अडकवले आहे. असे संपुर्ण शहरात सांगत आहे. यामुळे भुसावळ शहरातील सर्वच पोलीसांचे मनोबल खच्चीकरण झाले असुन गुन्हेगारांनी दोनच दिवसात डोके वर काढले आहे. सदर गुन्हयाचा तक्रारदार हा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेवर खोटया अॅन्टीकरप्शनचे ट्रॅप घडवुन आणण्यात सराईत असुन त्याने यापूर्वी मलकापुर व बुलढाणा येथे अशाच प्रकारच्या खोटया अॅन्टीकरप्शनच्या तक्रारीच्या आधारावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नुकसान केले आहे.
तरी सदर प्रकरणाची अॅन्टी करप्शन विभागाचा अनुभव असलेल्या निपक्ष व अनुभवी अधिकारी यांचे मार्फत चौकशी व्हावी व त्यांना योग्य न्याय मिळावा व भुसावळ शहरात आगामी काळात येणा-या नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेवून दोन महीन्यात चौकशी पुर्ण करुन पुन्हा भुसावळ येथे नियुक्ती व्हावी याकरीता आम्ही भुसावळवासी आपल्याकडे नम्र निवेदन सादर करीत आहोत.
या निवेदनावर मुकेश गुंजाळ, देवा वाणी, किरण कोलते, राजू आवटे, विसपुते नाना यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.