चाळीसगाव : प्रतिनिधी
कु. राजेश्वरी जाधव हिच्या ९ व्या स्मृतीदिना निमित्त शहरातील ० ते १४ वयोगटातील बालकांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी व निदान शिबिराचे आयोजन रामचंद्र य. जाधव व यश ग्रुप मित्र परिवाराने दि. २३ जुलै २०२३ रविवार रोजी बापजी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पालकांनी मुलांना घेऊन येण्यासाठी व जुनी फाईल असल्या सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
शिबिरात नामवंत नेत्ररोग तज्ञ डॉ. सो. भावना भामरे – बागड, नाशिक, बालनेत्रविकार तज्ञ, डॉ. पराग अनिल बागड, नाशिक पडद्याचे विकार तज्ञ, व डॉ. अमित महाजन नेत्ररोग तज्ञ, डॉ. प्रसाद पाठक नेत्ररोग तज्ञ, डॉ. कल्पेश सोनवणे, डॉ. संदीप साहू हे बालकांमधील जन्मजात विकृती तिरळेपणा, डोळ्यावरील भुरी व साय, बुबुळासंबंधीचे आजार, डोळ्यामागच्या पडद्यांचे आजार, डोळ्यांच्या नसांची तपासणी, भिंगाचा चष्मा नष्ट करणे व नेत्ररोगासंबंधी विविध आजारांची तपासणी व निदान करण्यात येणार आहे.
डॉ. शैलेंद्र सूर्यवंशी, डॉ. सौ. चंदा राजपूत, डॉ. प्रशांत शिनकर डॉ. शशिकांत राणा, डॉ. योगेश पोतदार, डॉ. विवेक बोरसे तसेच डॉ. सुनील राजपूत, डॉ. संदीप देशमुख, डॉ. मंदार करंबळेकर, डॉ. नरेंद्र राजपूत, डॉ हरीश राजानी, डॉ. विनोद कोतकर, श्री. रवींद्र शिरुडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे तरी गरजूंनी या बालनेत्र रोग शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजक रामचंद्र य. जाधव व मित्र परिवार, बापजी जीवनदीप मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल चाळीसगाव यांनी केले आहे.