Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आ.खडसेंचे जावई चौधरी यांना जामीन मंजूर !
    क्राईम

    आ.खडसेंचे जावई चौधरी यांना जामीन मंजूर !

    editor deskBy editor deskJuly 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आ.खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला असून गिरीश चौधरी यांना मनी लॉनड्रिंगच्या गुन्हयात ईडीने अटक केली होती. राज्याच्या राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी सध्या घडू लागल्या आहे.

    पुणे एमआययडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी हे दीड वर्षांपासून ईडीच्या ताब्यात होते. दरम्यान हे प्रकरण 2016 मधील असून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने भोसरी येथे एमआयडीसीमध्ये जागा खरेदी केल्याचा आरोप होता. खडसेंनी मंत्रीपदाचा गैरवापर करून कमी किंमतीत ही जागा खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी चौकशीसाठी झोटिंग समिती नेमण्यात आली होती.

    फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.