• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्य परिवहन मंडळाची कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा घेण्याची सूचना

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 11, 2021
in राज्य
0
राज्य परिवहन मंडळाची कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा घेण्याची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था ) सध्या एकाच वेळी अनेक संकटाचा सामना १८,००० एसटी बसचा ताफा असणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ करत आहे. डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे रद्द केलेल्या एसटी बसवर असणाऱ्या चालक आणि वाहकांना रजा घेण्यास सांगण्यात आल्याचा आरोप युनियनने केला आहे. गणेशोत्सवासाठी हजारो प्रवासी जाण्यासाठी रांगेत उभे असतानाही, गेल्या काही महिन्यांपासून पगाराच्या विलंबामुळे एसटी कामगारांना पैशांची गंभीर समस्या भेडसावू लागली आहे.

संथ गतीने सुरु असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबद्दल कामगार संघटना चिंता व्यक्त करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वेतन विलंबित आहे. पुढचा पगार कधी येईल हा प्रश्न नेहमीच असतो. बस चालवण्यासाठी डिझेलला पैसे नाहीत आणि यामुळे बस रद्द झाल्यावर कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास सांगितले जाते. हे एक संकट असल्याचे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे म्हणाले.

चिंतेची आणखी एक बाब म्हणजे कर्मचाऱ्यांचे लसीकरण. ९७,००० कर्मचारी सदस्यांपैकी सुमारे ५५,५१६ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, जे फक्त ५० टक्के आहे. आता ही प्रक्रिया आणखी मंदावली आहे, कारण स्थानिक पातळीवर अनेक वेळा, आगार व्यवस्थापक लसीकरणासाठी आवश्यक सुट्टी देत नाहीत. जालना, लातूर, अमरावती, बुलढाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाबाबत निराशाजनक परिस्थिती झाली आहे. एमएसआरटीसीच्या केवळ २० टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरण केल्याचे यांनी सांगितले.

Previous Post

जैन इरिगेशनचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर

Next Post

मनपात महापौर आणि विरोधी पक्षनेता पद एकाच कुटुंबात असणे लज्जास्पद

Next Post
मनपात महापौर आणि विरोधी पक्षनेता पद एकाच कुटुंबात असणे लज्जास्पद

मनपात महापौर आणि विरोधी पक्षनेता पद एकाच कुटुंबात असणे लज्जास्पद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group