• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात लग्नाच्या दोन महिन्यानंतर तरुणाने घेतला असा काही निर्णय !

editor desk by editor desk
July 21, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात लग्नाच्या दोन महिन्यानंतर तरुणाने घेतला असा काही निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी 

गेल्या दोन महिन्यापूर्वी लग्न होवून आपल्या आई वडिलांपासून विभक्त होत संसार थाटलेल्या जितेश अनिल राठोड २५ वर्षीय तरूणाने जळगावात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकळी येथील मुळचे रहिवासी असलेले सध्या शहरानजीक असलेल्या व्दारकानगरात अनिल रायसिंग राठोड हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून यात सगुनाबाई, मुलगा दिलीप आणि जितेश असे आहेत. ते हातमजूरी करून कुटुंबातील सदस्य उदरनिर्वाहास हातभार लावतात. जितेश याचे २२ मे २०२३ रोजी लग्न झाले होते. काही दिवसांनतर त्याने बिबानगरात पत्नीसोबत घर थाटले. रिक्षा चालवून तो प्रपंच चालवत होता. बुधवारी सायंकाळी तो घरी आला. घरात जितेश आणि त्याची पत्नी होती. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास त्याने टोकाचा निर्णय घेत गळफास घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नीने आरडाओरड केली. स्थानिक लोकांनी माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब मोरे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा निरोप कळताच वडिल अनिल राठोड व कुटुंबातील अन्य सदस्यांनी बिबानगरात धाव घेतली. अत्यवस्थेत असलेल्या जितेश याला पोलिसांनी तत्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात नेले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मृत घोषीत केले.
तरूणाचा मृत्यू झाल्याचे कळाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी मोठा आक्रोश केला. जितेश याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.

Previous Post

जिल्हाधिकारींची माणुसकी : अपघातग्रस्त तरुणाला दिला मदतीचा हात !

Next Post

आ.खडसेंचे जावई चौधरी यांना जामीन मंजूर !

Next Post
आ.खडसेंचे जावई चौधरी यांना जामीन मंजूर !

आ.खडसेंचे जावई चौधरी यांना जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group