भडगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका तरुणाची विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष देत तब्बल ५ लाख २९ हजार ५०८ रुपयात फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोघाविरोधात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी असलेल्या दीपक पितांबर चौधरी (वय ३८) यांना दि.४ फेब्रुवारीपासून तर आजपर्यंत दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार असे नाव सांगणार्या दोन अनोळखी इसमांनी स्वतःची ओळख लपवून मो.क्रं. 8116799318 व 9540283461 यावरुन दीपक यांच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधला तसेच त्यांना अविवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कंपनीमधून बोलत असल्याचे सांगून विमा पॉलीसीचा परतावा वाढवून देण्याचे आमिष दाखवले परंतु प्रत्यक्षात कोणताही परतावा न देता दीपक चौधरी यांना वेगवेगळे कारणे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन एकूण पाच लाख 29 हजार 508.60 एवढी रक्कम स्विकारुन फसवणूक केली. या प्रकरणी दीपककुमार तिवारी व हेमंत सरकार, असे नाव सांगणार्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक बबन जगताप करीत आहेत.