लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पालकमंत्री गुलाबराव पाटील नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेतून निलेश राणे यांनी पालकमंत्र्यांवर अर्वाच्च भाषेत केलेल्या टीकेच्या निषेधार्थ आज धरणगाव येथे शिवसैनिकांनी निलेश राणे यांची प्रतीकात्मक अंतयात्रा काढून निषेध व्यक्त केला.
राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अश्लील शब्द वापरल्याबद्दल धरणगाव शहरांमध्ये नारायण राणे याचे सुपुत्र निलेश राणे यांची अंतयात्रा हुबेहुब काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मीक पाटील, भैय्या महाजन, राहुल रोकडे,
योगेश वाघ व शिवसेनेचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.