जळगाव – राज्यभरात पाऊस जोरदार बरसात असून जळगाव जिल्ह्यातील पावसाचा जोर सकाळ पासून कायम आहे. तापी नदीच्या क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने हातनूर धरणाचे ४१ दरवाजे रात्री उघडले आहे. त्यामुळे तापी नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून सतत दार पाऊस सुरू असून रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तापी नदी वरील हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने हातनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आलेले आहे. मानवीय व पशु हानी होऊ नये यासाठी तापी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे.
१ लाख ३७ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग
मध्य प्रदेश व विदर्भात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आला आहे. हातनुर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे दक्षता हातनुर धरणाचे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे उघण्यात आल्याने यातून ३८८२ क्युमेक्स १३७०९३ क्युसेक्स घ.मी.प्र.से. एवढा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र मध्य प्रदेशचा संपर्क तुटला
रावेर तालुक्यात जोरदार पावसाची बॅटिंग गेल्या दोन दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे लहान मोठ्या नद्यांना ही पूर आला असून महाराष्ट्र मध्य प्रदेश ला जोडल्या जाणाऱ्या निंभोरा नदीवरील पुल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूचे वाहतूक थांबलेली आहे.