Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : रस्त्यावर चारचाकीचे टायर फुटल्याने महिलेचा मृत्यू !
    Uncategorized

    धरणगाव : रस्त्यावर चारचाकीचे टायर फुटल्याने महिलेचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 19, 2023Updated:July 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    धरणगाव तालुक्यातील गावाजनीक आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकीचे टायर फुटल्याने रोडवरील भिंतीला आदळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील शेख अफसर शेख तय्यब हे आपल्या परिवारासोबत बुधवारी १९ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास चारचाकीने धरणगावकडून अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले असतांना चारचाकीच्या पुढील शीटवर शरीफाबी शेख तय्यक (वय-५६) बसलेल्या होत्या. धरणगाव तालुक्यातील चांदणी कुऱ्हा गावानजीक भरधाव चारचाकीचे अचानक मुख्य रस्त्यावर टायर फुटले. त्यामुळे शेख अफसरचा चारचाकीचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर आदळली. यात शरीफाबी या महिला गंभीर जखमी झाल्या. स्थानिक गावकरी आणि वाहनधारकांच्या मयतीने जखमी महिलेला बाहेर काढून तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून मयत घोषीत केले. दुपारी अडीच वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाळधीत मोठी दुर्घटना! स्लॅब कोसळून ७ कामगार जखमी, २ गंभीर

    March 16, 2026

    बचत खात्यात शिल्लक कमी? दंडाबाबत मोठी माहिती समोर

    March 11, 2026

    प्रशासकीय राजवटीतील निर्णयांवर श्वेतपत्रिका जाहीर करा नगरसेविका वैशाली अमित पाटील

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.