पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ असलेल्या बिबण्या नाल्यावर पाचोरा येथून सातगाव डोंगरीला कापूस भरण्यासाठी जात असलेला ट्रक सातगाव (डोंगरी) येथे मुक्कामी असलेली पाचोरा आगाराच्या बसवर जावून घडल्याने अपघात झाला. यात बस मधील १३ शाळकरी विद्यार्थी, बसचालक, २३ जण किरकोळ जखमी झाले. अपघाताचे वास्तव पाहून ट्रक चालक आपले वाहन जागेवरच सोडून पसार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा-मोंढाळा रस्त्यावरील मौनगिरी साखर कारखान्यासमोर मंगळवारी १८ जुलै रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाचोऱ्याच्या दिशेने येणारी बस क्रमांक (एमएच १० बीएल १६१८) आणि पाचोराकडून (सातंगाव डोंगरी) मोंढाळाकडे जाणारा ट्रक क्रमांक (एमएच २०- ७५२१) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात १३ विद्यार्थ्यांसह २० प्रवाशी जखमी झाले आहे. या बसमध्ये १३ विद्यार्थी व ७ प्रवाशी असे २० प्रवासी होते. बस व ट्रक अपघाताचे वृत्त शहरासह तालुक्यात पसरल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालक, कमालीचे भयभीत झाले व त्यांनी लगबगीने अपघातस्थळ गाठले. तसेच शैक्षणिक संस्थांचे चालक, विविध शाळातील शिक्षक, सेवाभावी संस्था संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनीही घटनास्थळी व नंतर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतल्याने प्रचंड गर्दी व गोंधळ निर्माण झाला.