लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: कुस्ती मल्लविद्या महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस मेजर धर्मराज पाटील तसेच भडगाव तालुका सदस्य महेंद्र केदार यांनी आज धरणगाव येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचा विकल्प ऑर्गनायझेशन तर्फे सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुस्ती मल्लविद्या महासंघ संचलित महाराष्ट्रातील दुसरे मल्लविद्या कुस्ती केंद्र धरणगावात स्थापन करण्यात येणार आहे. कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक अध्यक्ष श्री. गणेश मानगुडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कुस्ती केंद्र स्थापन करण्याच्या मानस आहे. यासंदर्भात आज कुस्ती मल्लविद्या महासंघ धरणगाव तालुक्याची मिटिंग विकल्प ऑर्गनायझेशन च्या कार्यालयात संपन्न झाली. याप्रसंगी मेजर धर्मराज पाटील व महेंद्र केदार यांचा शाल – श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना मेजर धर्मराज पाटील यांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्र नेहमीच उपेक्षित असतं. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही आमच्या परीने भरपूर प्रयत्न करत असतो परंतु शासन – प्रशासन यांच्या सोबत समन्वय साधण्यासाठी विकल्प ऑर्गनायझेशन सारख्या संस्थांचे जर पाठबळ मिळाले तर अजून चांगल्या प्रकारे काम करता येईल, अशी अपेक्षा मेजर पाटील यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी धरणगाव तालुका क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी सर, बालकवी ठोंबरे विद्यालयाचे वाय. पी. पाटील सर, विकल्प ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, सचिव नरेंद्र पाटील सहसचिव गणेश चौधरी, कार्यक्रम समन्वयक लक्ष्मण पाटील, लाली ऑटो पार्ट्स चे संचालक शिवाजी (आप्पा) चौधरी, तृप्ती रेस्टॉरंट चे संचालक प्रथम सूर्यवंशी, पै. आनंद पहेलवान (वस्ताद), पै. संदीप (आबा) कंखरे, पै. विकास धनगर, पै. महेश वाघ, पै. शिव लोखंडे, पिंप्री येथील पै. गणेश कुऱ्हाडे, पै. गोपाल कुऱ्हाडे, कृष्णा कुऱ्हाडे, दिपक कुऱ्हाडे, महेंद्र कुऱ्हाडे तसेच कुस्ती मल्लविद्या धरणगाव ची टीम उपस्थित होती.