• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी : पाच दुचाकीसह चोरटा अटकेत !

editor desk by editor desk
July 18, 2023
in क्राईम, जळगाव
0
जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी : पाच दुचाकीसह चोरटा अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असतांना जिल्हा पेठ पोलिसांनी सोमवारी एरंडोल येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी एका खासगी कंपनीत रिकव्हरी एजंटचे काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चंद्रकांत रामदास साळुंखे (वय ४२, रा. हिराशिवा कॉलनी) असे अटकेतील संस्थेत आरोपीचे नाव आहे.

जिल्हापेठ पोलिसांच्या हद्दीसह शहरातील विविध ठिकाणी दुचाकीची चोरी केल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यासंदर्भात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा शोध घेत असताना चंद्रकांत साळुंखे हाच दुचाकींची चोरी करीत असल्याचे समोर आले.

जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे संशयित आरोपी चंद्रकांत रामदास साळुंखे याची माहिती मिळाली. त्यानंतर अधिक माहिती मिळविली असता संशयित आरोपी हा एरंडोल शहरात असल्याचे समजले. त्यानुसार सोमवारी सकाळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, महिला पोलिस नाईक भारती देशमुख यांनी संशयित आरोपी चंद्रकांत साळुंखे याला एरंडोल शहरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

दोघांवर एमपीडीएअंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई

Next Post

जामनेरात खळबळ : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

जामनेरात खळबळ : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group