Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोठी बातमी : राष्ट्रवादीत सुरु आहे तरी काय ? अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला !
    राजकारण

    मोठी बातमी : राष्ट्रवादीत सुरु आहे तरी काय ? अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला !

    editor deskBy editor deskJuly 17, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    भाजप व शिवसेनेसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाध्यक्ष शरद पवार यांची घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांनी रविवारीच पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या गोटातील आमदार शरद पवारांची भेट घेणार आहेत.

    शरद पवार वाय बी सेंटरमध्ये उपस्थित नाहीत. ते थोड्याच वेळात तिथे पोहोचतील. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांना बजावलेले व्हीप तथा विरोधी पक्षांच्या बंगळुरूतील बैठकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपल्या समर्थक 9 मंत्र्यांसह शरद पवार यांची बाय बी चव्हाण सेंटरला जावून भेट घेतली. त्यात या नेत्यांनी त्यांच्याकडे भाजपसोबत येण्याचा आग्रह धरला. पण पवारांनी त्यांच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परिणामी, अजित पवार गटाच्या नेत्यांनी ही बैठक आटोपती घेतली. या भेटीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत असताना सोमवारी पुन्हा अजित पवार आपल्या आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ढोल-ताशांच्या गजरात महाराष्ट्र रंगला

    March 3, 2026

    सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा रणसंग्राम!

    March 3, 2026

    मध्यपूर्वेत युद्धज्वाला; दुबई विमानतळ ठप्प, प्रवाशांचा थरारक अनुभव

    March 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.