नागपूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेना-भाजपसोबत सत्तेत सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ८ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ देखील घेतली. त्यानंतर रविवारी अजित पवारांसह ८ आमदारांनी थेट शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधान आले होते. तर आजपासून १७ जुलै म्हणजेच आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय खडाजंगी पाहायला मिळण्याची शक्यता आधीपासून वर्तवली जात होती. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांमध्ये त्याचा प्रत्यय आला आहे.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उभं राहून नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी नव्या मंत्र्यांचा परिचय द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांचा परिचय करून देताना उपमुख्यमंत्री व वित्त म्हंटलं आणि त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. त्यानंतर बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना ‘नाव सांगा’, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं.