• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर गुन्हा दाखल करेन !

एका महिलेविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 17, 2023
in क्राईम, जळगाव
0
मैत्रीत दगाबाजी : मित्राच्या बायकोला घेवून फरार !

जळगाव : प्रतिनिधी 

लग्नापूर्वी पतीचे ज्या महिलेशी प्रेमसंबंध होते, त्या महिलेने घरी येऊन तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी देत या ‘पतीदेवा’च्या पत्नीला मारहाण केल्याची घटना १४ जुलै रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या घडली. याप्रकरणी १५ जुलै रोजी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या बचावासाठी या पत्नीने पुढाकार घेत महिलेविरुद्ध फिर्याद दिली.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून एका महिलेसोबत प्रेम संबंध होते. मात्र या तरुणाचे लग्न झाल्याने त्याने सदर महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे सदर महिला या तरुणाच्या पत्नीला वारंवार फोन करून शिवीगाळ करीत असे. परिणामी पत्नीने महिलेचा मोबाइल क्रमांक ब्लॉक केला. तरीदेखील ती महिला दुसऱ्या क्रमांकावरून वारंवार संपर्क साधत शिवीगाळ करते व मानसिक व त्रास देत असल्याचे या तरुणाच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. १४ जुलै रोजी सदर महिला या तरुणाच्या घरी पोहचली व तुझा पती कोठे आहे, असे तरुणाच्या पत्नीला विचारले. त्याला माझ्याकडे पाठव नाही तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीत त्याची नोकरीही खावून टाकेल, तुमची समाजात बदनामी करेल, अशी धमकी दिली. मला पाच लाख रुपये द्या असे म्हणत महिलेने तरुणाच्या पत्नीला मारहाण केली. याप्रकरणी तरुणाच्या पत्नीने सदर महिलेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याची नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

चाळीसगाव पोलिसांची मोठी कामगिरी : गुप्तधनासाठी पुजा करणारी टोळी जेरबंद !

Next Post

धरणगाव : विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विवाहितेचा मृत्यू !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

धरणगाव : विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विवाहितेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group