• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ ; थरारक व्हिडीओ !

editor desk by editor desk
July 16, 2023
in क्राईम, राज्य
0
मुलाच्या मोबाईलमध्ये कैद झाला आईच्या मृत्यूचा व्हिडिओ ; थरारक व्हिडीओ !

मुंबई : वृत्तसंस्था 

पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी समुद्रात जाऊ असं आव्हान वारंवार केलं जातं. अनेकवेळा याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हे नसतं धाडस जीवावरही बेतू शकतं. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्राला उधाण आलं असताना एक जोडप समुद्रातील खडकावर बसून फोटोशूट करत होतं. तर त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये त्यांचा व्हिडिओ बनवत होता. पण तो क्षण त्यांच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. मुलाच्या मोबाईलमध्ये त्याच्या आईचा मृत्यूचा थरार कैद झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना प्रत्येकासाठी इशारा आहे. समुद्राला उधाण आलं असताना समुद्रापासून दूर राहिला पाहिजे. थोडीसी मस्करी जीवावार बेतू शकते. नेमकं याकडेच या जोडप्याने दुर्लक्ष केलं आणि एका चुकीमुळे महिलेने जीव गमावला. समुद्राच्या लाटेबरोबर ही महिला समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलांच्या डोळ्यादेखत त्या महिलेचा जीव गेला. ही घटना मुंबईतल्या बँड स्टॅंड इथली आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आपल्या प्रत्येकासाठी सावध करणारा आहे.

This is so horrible How can a person risk their life for some videos..
The lady has swept away and lost her life in front of his kid.#bandstand #Mumbai pic.twitter.com/xMat7BGo34

— Pramod Jain (@log_kyasochenge) July 15, 2023

 

मिळालेल्या माहितीनुसार 9 जुलैला एक कुटुंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलं होतं. मुकेश सोनार, पत्नी ज्योती सोनार आणि त्यांची तीन मुलं रविवार असल्याने बँड स्टॅंड जवळ मौजमजेसाठी आले होते. यावेळी समुद्राच्या पार्श्वभूमीवर फोटो काढण्याचा मोह मुकेश आणि ज्योती सोनारला झाला. मुकेश आणि ज्योती समुद्रातील खडकांवर बसून फोटोशूट करत होते. तर त्यांचा मोठा मुलगा मोबाईलमध्ये आपल्या आई-बाबांचे फोटो आणि व्हिडिओ बनवत होता. काहीवेळ असाच मजेत गेला. पण अचानक समुद्राची एक मोठी लाट आली आणि त्या लाटेत पती आणि पत्नीचा हात सुटला. पत्नी लाटेबरोबर समुद्रात वाहून गेली. पती आणि मुलं तीला वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडू लागली. पण उसळत्या समुद्रात तिला वाचवणं त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांच्या डोळ्यादेखत महिला समुद्रात वाहून गेली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ट्वीटरवर Pramod Jain या अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. नवी मुंबईतल्या गौतम नगर इथं मुकेश आणि ज्योती सोनार आपल्या तीन मुलांसह राहातात. मुकेश एका खासगी कंपनीत टेक्निशियन आहेत. पती मुकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रात मोठी लाट आल्यानंतर ज्योतीचा तोल गेला, आपण तिची साडी पकडत तिला सांभाळण्याच प्रयत्न केला. त्याचवेळी तिथं असलेल्या एका माणसाने ज्योतीचा पाय पकडला. पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याच्या हातातून तिचा पाय निसटला आणि ज्योती समुद्राच्या पाण्यात वाहून गेली. मुलाच्या मोबाईलमध्ये आयुष्यातले आनंदच क्षण टिपले जात असतानाच दुर्देवाने आईच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओही कैद झाला. आपली आई आपल्यापासून डोळ्यादेखत कायमची निघून जाईल अशी जराशीही शंका त्या मुलांच्या मनात आली नसेल.

Previous Post

रोपे पाठविण्याच्या नावाखाली जळगावच्या तरुणाला २५ लाखांत फसवणूक !

Next Post

चाळीसगाव पोलिसांची मोठी कामगिरी : गुप्तधनासाठी पुजा करणारी टोळी जेरबंद !

Next Post

चाळीसगाव पोलिसांची मोठी कामगिरी : गुप्तधनासाठी पुजा करणारी टोळी जेरबंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group