Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रोपे पाठविण्याच्या नावाखाली जळगावच्या तरुणाला २५ लाखांत फसवणूक !
    क्राईम

    रोपे पाठविण्याच्या नावाखाली जळगावच्या तरुणाला २५ लाखांत फसवणूक !

    editor deskBy editor deskJuly 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  : प्रतिनिधी 

    गार्डन डेव्हलपींगसाठी रोपे पाठविण्याच्या नावाखाली तरुणाला २५ लाखांचा गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंद अगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विद्युत कॉलनीमध्ये राहणारे दीपक बळीराम चौधरी हे वास्तव्यास असून यांचा गार्डन डेव्हलपींगचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना विविध प्रकारचे झाडे लागत असल्याने गेल्यावर्षी दि. ५ जानेवारी २०२२ मध्ये त्यांनी शंकर गवळा रा. चित्रदुर्ग कर्नाटक यांच्यासोबत संपर्क साधला होता. त्यांनी मला गार्डन डेव्हलपींगसाठी लागणाऱ्या झाडांबाबत सांगितले असता, शंकर गवळी यांनी त्यांना सागवान व इतर झाडे घेण्यासाठी चित्रदुर्ग येथे बोलावून घेतले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी तेथे जावून सुमारे दीडलाख रुपयांचे रोखीने झाडे खरेदी केली होती. त्यानंतर चौधरी यांना पुन्हा झाडे लागत असल्यांनी त्यांनी शंकर गवळा यांच्याशी सपर्क साधून झाडांबाबत सांगितले. त्यानुसार दीपक चौधरी यांनी शंकर गवळा यांच्या बँक खात्यावर आरटीजीएस पद्धतीने १५ लाख रुपये पाठविले. त्यानंतर वेळोवही चौधरी यांचा संपुर्ण विश्वास संपादन करीत त्यांच्याकडून उर्वरीत दहा लाख रुपये चौधरी यांनी दोन वेळेस शंकर गवळा याच्या बँक खात्यावर पाठविले.

    तीन वेळा सुमारे २५ लाख रुपये पाठवून देखील समोरील व्यक्ती झाडे पाठवित नव्हती. आपली फसवणुक झाल्याचे समजल्यानंतर दीपक चौधरी यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार शंकर गवळा रा. चित्रदुर्ग राज्य कर्नाटक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मोठी बातमी : महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा !

    March 6, 2026

    दिवसाढवळ्याची हत्या; नवऱ्यासह बायकोने बॉयफ्रेंडला संपवलं !

    March 5, 2026

    सरपंच‑उपसरपंचांवर राजकीय कट; पिकअप गाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न !

    March 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.