Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा !
    कृषी

    धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 6, 2021No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकरी सुखी तर जग सुखी – ना.गुलाबराव पाटील

    धरणगाव लक्ष्मण पाटील: शहरातील साने पटांगणावर महात्मा बळीराजा लोकोत्सव समिती धरणगाव यांच्या वतीने जगाचा पोशिंदा, लोककल्याणकारी, महात्मा बळीराजा गौरव दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. प्रास्ताविकात महात्मा बळीराजा यांच्या काळात शेतकरी अतिशय सुखी व समाधानी होता. लोककल्याणकारी राजा म्हणून बळीराजाची ख्याती होती, म्हणूनच दिवाळी सणामध्ये घराघरातील माता-भगिनी म्हणतात – “इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो” अशा महान राजाच्या कार्याबद्दल ग्रामस्थांना विस्तृत अशी माहिती सांगितली. तसेच याप्रसंगी पाटील सरानी आपल्या शहरात महात्मा बळीराजाचे भव्यदिव्य स्मारक व्हावे, अशी अपेक्षा बळीराजा लोकोत्सव समितीच्या वतीने व्यक्त केली.

    याप्रसंगी बळीराजाची आठवण यावी म्हणून प्रभाकर पाटील या शेतकरी बांधवाने नांगर ला झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले.

    याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे डी. जी. पाटील यांनी महात्मा बळीराजा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. बळीराजा आपले दैवत आहेत त्यांची संस्कृती आपण जोपासली पाहिजे. कृषिप्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था दुर्दैवी झाली आहे. पुन्हा एकदा बळीराजाचे राज्य यावे अश्या आशा व्यक्त केल्या. प्रा. बी. एन. चौधरी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्याला उभे केले पाहिजे. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी शेतकऱ्याने कच्च्या मालापासून पक्का माल तयार करून बाजारात विकून स्वावलंबी झाले पाहिजे. माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी यांनी सांगितले, शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करून मोठे व्हावे असेही मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

    लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की, आपल्या शहरात बळीराजाचे स्मारक नक्कीच उभारता येईल, आपण जागा सुचवावी त्यासंदर्भात आम्ही शासकीय कागदपत्रांचा पाठपुरावा करून योग्य ती मदत करण्यास तत्पर आहोत, असेही यावेळी गुलाबराव वाघ म्हणाले.

    आजच्या या बळीराजा लोकोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी नामदार पाटील म्हणाले की, शेतकरी सुखी तर जग सुखी आणि मी सुद्धा बळीराजाचा पुत्र आहे. सध्याचे महाविकास आघाडी सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहील, असे प्रतिपादन करत सर्व बांधवांना बळीराजा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

    या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, भा. रा. काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धनराज मोतीराया सर, राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, चर्मकार महासंघाचे नेते भानुदास विसावे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, जेष्ठ साहित्यिक प्रा.बी.एन.चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते दिपकराव वाघमारे, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा माळी, पाटील समाजाचे अध्यक्ष भिमराज पाटील, मराठे समाजाचे अध्यक्ष जयसिंग मराठे, पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड. व्ही. एस.भोलाणे, जेष्ठ पत्रकार कडू रूपा महाजन, मोतीआप्पा पाटील, राजेंद्र ठाकरे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, सुरेश (बुट्या) महाजन, भागवत चौधरी, विलास महाजन, माजी नगरसेवक निलेश चौधरी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, साई लॅबचे महेश पाटील, श्री पॅथॉलॉजीचे नरेंद्र पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते महात्मा बळीराजा यांच्या प्रतिमेचे व नांगराचे पूजन करण्यात आले.

    भाजपा ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माजी नगरसेवक अभिजित पाटील, व्ही. टी. माळी, धिरेंद्र पुरभे, विजय वाघमारे, वाल्मिक पाटील, महेंद्र (भैय्या) महाजन, प्रभुदास (बालू) जाधव, महेश (बंटी) पवार, मोहन महाजन, प्रशांत देशमुख, राजू पाटील, आबा महाले, संतोष भडांगे सर, व्यापारी सेनेचे दिनेश येवले, धनंजय कापडणे, रविंद्र कंखरे, राहुल रोकडे, प्रदीप मराठे आदी मान्यवरांनी महात्मा बळीराजाच्या प्रतिमेसह नांगराचे ही पूजन केले. बळीराजा महोत्सव कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे जगदंबा टेंटचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार महात्मा फुले हायस्कुलचे हेमंत माळी यांनी मानले.

    बळीराजा लोकोत्सव गौरव दिन कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आबासाहेब राजेंद्र वाघ, हेमंत डी. माळी, किशोर पवार, प्रा. रविंद्र मराठे, लक्ष्मण पाटील, आनंद पाटील, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, निलेश पवार, गौतम गजरे, प्रफुल पवार, राहुल पाटील, गोकुळ पाटील, मुन्ना पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी धरणगाव शहर व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    युगेंद्र पवारांच्या लग्नात ‘आत्याबाई’ सुप्रिया सुळे रंगल्या सणसणीत ठेक्यावर

    December 1, 2025

    राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय : शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच छताखाली; कृषी समृद्धी योजना वेगाने राबविणार !

    November 26, 2025

    पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : “शतकांच्या जुन्या जखमा आज भरल्या…”

    November 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.