Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » काश्मिरात सीआरपीएफचे जवानांची गाडी सिंध नदीत कोसळली !
    क्राईम

    काश्मिरात सीआरपीएफचे जवानांची गाडी सिंध नदीत कोसळली !

    editor deskBy editor deskJuly 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील अनेक राज्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यात एक गाडी रविवारी सकाळी सिंध नदीत कोसळली. या गाडीतून सीआरपीएफचे जवान प्रवास करत होते. अपघातात ८ जवान जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सीआरपीएफचे जवान बालटालच्या रस्त्याने अमरनाथ गुहा मंदिराच्या दिशेने जात होते. तेव्हा ही दुर्घटना घडली. अपघातात जखमी सीआरपीएफ कर्मचाऱ्यांना वाहनातून बाहेर काढलं आहे. बालटाल इथल्या बेस शिबिराच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. गांदरबलच्या बटाल भागात नीलग्रार हेलिपॅडजवळ गाडी सिंध नदीत कोसळली.अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले आहेत.

    अमरानथ यात्रेचा काळ वगळता इतर दिवशीही सुरक्षा व्यवस्था तैनात असते. आमचे प्राधान्य लोकांची सुरक्षा आहे. स्थानिकांकडूनही यासाठी चांगली मदत मिळते असं सीआरपीएफने म्हटलंय. हिमालयात ३ हजार 888 मीटर उंचीवर गुहेत मंदिर असून वर्षात ६२ दिवसांची वार्षिक तीर्थयात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सीआरपीएफकडे अद्ययावत अशी सुरक्षा साधने आहेत आणि काश्मीरच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी याची मदत होते. सीआरपीएफच्या महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षातील सर्व दिवस आम्ही सुरक्षेत तैनात असतो. यात्रा असो किंवा नसो. यात्रेच्या पार्श्वभूमीवर तैनात जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.