घटनास्थळी हायवे पोलीस स्थानकाचे कर्मचारी दाखल
जळगाव एरंडोल महामार्गावर सुरू असलेल्या अपघाताची मालिका कुठल्याही परिस्थितीत थांबण्याचे नाव घेत नसून आज देखील पुन्हा एकदा ट्रक व चार चाकीमध्ये अपघात झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव एरंडोल रस्त्यानजीक असलेल्या मुसळी फाट्याजवळ भरदा वेगाने जात असलेल्या ट्रकने चारचाकीला जोरात कट मारल्याने चार चाकी रस्त्याच्या कडेला गेली सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसत नाही.
घटनास्थळी पाळधी महामार्ग पोलीस स्थानकाचे सहाय्यक फौजदार गुलाब मनोरे हवालदार संजय तेली. सलीम शेख. सूर्यवंशी पाळधी महामार्ग पोलीस यांनी सदर कार मधील लोकांना बाहेर काढला डीपीपासून बाजूला करून व ट्रक व ट्रक चालक याला पारधी पोस्ट चे कर्मचारी यांच्या ताब्यात पुढील कारवाई करणे दिले आहे.