Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच जणांना खंडपिठाची नोटीस !
    क्राईम

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पाच जणांना खंडपिठाची नोटीस !

    editor deskBy editor deskJuly 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    दुचाकी चोरीचा आरोप करीत पुणे येथे कंपनीत असलेल्या नितीन दत्तू पाटील या तरुणाला ताब्यात घेत त्याला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह पाच कर्मचान्यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२३ रोजी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.

    तरुणाच्या आईने नशिराबाद पोलिस ठाण्यासह पोलीस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला. अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत संबंधितांवर कारवाई करण्यासह पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मूळ नाचणखेडा, ता. जामनेर येथील रहिवासी असलेल्या यमुनाबाई दत्तू पाटील या सध्या शिवकॉलनीत राहतात. त्यांचा मुलगा नितीन हा पुणे येथे कंपनीत कामाला असताना त्याला दुचाकी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याचे यमुनाबाई यांचे म्हणणे आहे. त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र काहीही कार्यवाही न झाल्याने २९ मे २०२१ रोजी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. कर्मचाऱ्यांवर कारवाई पोलिस होत नसल्याने यमुनाबाई यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.