जळगाव : प्रतिनिधी
शहरात अवैध वाळूमाफियांना लगाम लावण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने मोठी मोहीम हाती घेतली असून आता तालुका पोलिसांनी भर दिवसा सुरु असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर खोटे नगर स्टॉप जवळून पकडले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून अनेक वाळूमाफिया खोटे नगर परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीसांना मिळताच मंगळवारी ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली पोलीसांनी जप्त केले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना ट्रॅक्टर चालक मुकेश पेरकाश सपकाळे (वय-३३) रा. निमखेडी ता.जि.जळगाव याच्याकडे आढळून आला नसल्याने चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक रामकृष्ण इंगळे करीत आहे.