यावल : प्रतिनिधी
तालुक्यात एका गावात राहणाऱ्या २४ वर्षीय महिलेचा एकाने दारूच्या नशेत असतांना हात पकडून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला आपल्या परिवारासोबत रहिवासास आहे. दि.११ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास याच गावातील संशयित आरोपी जितेंद्र तायडे हा दारूच्या नशेत येऊन महिला घरी एकटी असल्याची संधी सांधत त्याने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे केल्याने महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केला घडलेला प्रकार विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेत महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जितेंद्र तायडे यांच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे करीत आहे.