• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : महत्वाची खाते सोडण्यास मुख्यमंत्री शिंदेंचा नकार !

editor desk by editor desk
July 12, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मोठी बातमी : महत्वाची खाते सोडण्यास मुख्यमंत्री शिंदेंचा नकार !

मुंबई : वृत्तसंस्था 

गेल्या 3 दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यात या विषयांवरून मध्यरात्री बैठका घेऊन खल सुरू आहे. मंगळवारी रात्रीदेखील 1 वाजेपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये खातेवाटपावर दोन तास चर्चा झाली. मात्र, अजूनतरी खातेवाटपावर तोडगा निघालेला नाही. बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागत असल्याने आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्येही अस्वस्थता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी अर्थ, सहकार, सांस्कृतिक, महिला व बालविकास, वस्त्र उद्योग, अन्न व पुरवठा, क्रीडा, पशुसंवर्धन, वैद्यकीय शिक्षण व आदिवासी कल्याण या खात्यांसाठी आग्रह धरला आहे. तर, सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते अजित पवार यांना द्यावे, अशीही मागणी केली जात आहे. मात्र, शिंदे गटाने अर्थखाते अजित पवारांकडे देण्यास विरोध केला आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वाट्याला आलेली दोन महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला सोडण्यास ठाम नकार दिल्याची माहिती आहे. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप लांबणीवर पडले आहे.

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत बैठक झाली. पुन्हा मंगळवारी दुपारी अजित पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर रात्री 1 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान वर्षावर अजितदादा, शिंदे व फडणवीसांची चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे खातेवाटपावर सहमती होऊ शकलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजप नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते सोपविण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा विरोध आहे. परंतु, भाजपने अजित पवार यांना अर्थ खाते देण्याचेच आश्वासन दिल्याचे सांगण्यात येते. महाविकास आघाडीत असताना निधीवाटपावरून आमदारांमध्ये असलेली नाराजी लक्षात घेता गेल्या आठवड्यात वांद्रे येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी निधी वाटपात कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, ऐवढ्यावरून शिंदे गट मागे हटायला तयार नाही.

Tags: #ajitpawar#cmshinde#ncp
Previous Post

सप्तश्रृंगी गड बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील १६ भाविक जखमी !

Next Post

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत अमळनेरच्या महिला भाविकाचा मृत्यू !

Next Post
सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत अमळनेरच्या महिला भाविकाचा मृत्यू !

सप्तश्रृंगी गड घाटात बस दरीत अमळनेरच्या महिला भाविकाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group