धरणगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील महामार्ग क्र.६ वर नियमित अपघाताची संख्या वाढत असतांना आज दुपारी पुन्हा एकदा बसचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हि घटना जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न यागावाजवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव-एरंडोल रस्त्यावर असलेल्या एक लग्न या गावाजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इगतपुरी बस डेपोतील जळगाव शहरातील बस स्थानकावरून इगतपुरी जाणारी बस क्र.एम.एच.४०.एक्यू.६०१० या बसने भरधाव कंटेनरला मागून धडकल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांनी लागलीच खाजगी रुग्णावाहिका पाठवून अपघातग्रस्ताना मदत मिळवून दिली. या बसमध्ये एकूण ६२ प्रवासी प्रवास करीत असून अपघातात २ प्रवसी जखमी असल्याचे माहिती समजत आहे.