• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘ते’ आमदार शरद पवारांकडून अजित पवारांच्या गटात !

editor desk by editor desk
July 11, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
‘ते’ आमदार शरद पवारांकडून अजित पवारांच्या गटात !

मुंबई : वृत्तसंस्था 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांमधील एका आमदारांनी आज अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शपविधीच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलेले अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे नंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत गेले. त्यानंतर पुन्हा गाठीभेटी सुरू झाल्या. आज पुन्हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता देवगिरी या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार पक्षाची बैठक बोलावली होती त्या बैठकीत किरण लहामाटे हे उपस्थित होते. आज ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता आले आहेत.

अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी डॉ. लहामटे अजित पवार यांच्यासोबत होते. त्यापूर्वी तयार करण्यात आलेल्या अनेक कागदपत्रांवर त्यांनी सह्या देखील केल्या होत्या. मात्र, दुसऱ्या दिवशी लहामटे शरद पवार यांच्याकडे परतले. मुंबईतील सभेला त्यांनी उपस्थितीही लावली त्यामुळे पुन्हा ते कोणाला पाठिंबा देणार याबाबत याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. आपल्याकडून फसवून सह्या करून घेतल्याचे त्यांनी म्हंटलं होतं. तेव्हापासून लहामटे यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.

अजित पवार यांनी लहामटे यांना परत आणण्याची जबाबदारी नगरचे विळद येथील त्यांचे विश्वासू कार्यकर्ते बाळासाहेब जगताप यांना देण्यात आली होती. जगताप यांनी डॉ. लहामटे यांची समजूत काढली. मात्र, ते सहजासहजी तयार होत नव्हते. विविध माध्यमांतून लहामटे यांच्याशी संपर्क साधण्याचा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र लहामटे त्यांना टाळत होते. त्यानंतर आज लहामाटे अजित पवार यांच्या भेटीला आले आहेत.

Tags: #ajitpawar#ncp
Previous Post

दोन दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

अजित पवारांच्या दोन मंत्र्यांनी मारण्याची धमकी ; ५० लाखांची केली मागणी !

Next Post
अजित पवारांच्या दोन मंत्र्यांनी मारण्याची धमकी ; ५० लाखांची केली मागणी !

अजित पवारांच्या दोन मंत्र्यांनी मारण्याची धमकी ; ५० लाखांची केली मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

पहूर येथे चारचाकीने मायलेकीना दिली धडक : अखेर गुन्हा दाखल !

June 26, 2025
मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून ; जिल्ह्यातील दुर्दैवी घटना
क्राईम

खळबळजनक :  अनोळखी महिलेचा खून करून मृतदेह गोणीत भरून फेकला !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group