• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वृद्ध दाम्पत्यांनी पोलिसांना फोन करीत संपविली जीवनयात्रा !

पाचोरा तालुक्यातील धक्कादायक घटना

editor desk by editor desk
July 10, 2023
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
वृद्ध दाम्पत्यांनी पोलिसांना फोन करीत संपविली जीवनयात्रा !

पाचोरा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील वृद्ध दाम्पत्यांनी संसाराला कंटाळल्याने येथून पुढे जगण्याची इच्छा नाही, असा फोन पाचोरा पोलिसांना करीत लोहटारच्या वृध्द दाम्पत्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. यात ईश्वर नामदेव पाटील (७८) व प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. हि घटना शनिवारी घडल्यानतंर दोघांना उपचारार्थ हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील एस.टी.महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी ईश्वर नामदेव पाटील (७८) व त्यांच्या पत्नी प्रमिलाबाई ईश्वर पाटील (७२) हे दाम्पत्य अध्यात्मिक मार्गावर होते. शनिवार, 8 जुलै रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास पाचोरा पोलिसात ईश्वर पाटील यांनी संसाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा निरोप देत फोन ठेवला. पोलिसांनी तत्काळ लोहटार गाठले असता ईश्वर पाटील व प्रमिलाबाई पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याचे त्यांना दिसून आल्यानंतर त्यांना सुरूवातीला ग्रामीण रुग्णालयात व नंतर खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असतांना सोमवार, 10 जुलै रोजी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास प्रमिलाबाई पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली तर काही तास उलटत नाही तोच सकाळी आठ वाजेच्या सुमारास ईश्वर पाटील यांनीही जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील करीत आहेत. दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परीवार आहे. सोमवारी शोकाकुल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Previous Post

शिंदे गटाला धक्का : अर्थमंत्री खाते अजित पवारांकडे ?

Next Post

१० वर्षात केले १५ मुलीसोबत लग्न ; वाचून बसेल धक्का !

Next Post
१० वर्षात केले १५ मुलीसोबत लग्न ; वाचून बसेल धक्का !

१० वर्षात केले १५ मुलीसोबत लग्न ; वाचून बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group