Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शिंदे गटाला धक्का : अर्थमंत्री खाते अजित पवारांकडे ?
    राजकारण

    शिंदे गटाला धक्का : अर्थमंत्री खाते अजित पवारांकडे ?

    editor deskBy editor deskJuly 10, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री खाते असल्याने ते शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याची तक्रार करीत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उभी फुट पाडली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली आहे. अजित पवार यांना राज्यमंत्रिमंडळात स्थानही देण्यात आलं आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र, अद्याप खाते दिलं नाही. अजितदादांना अर्थमंत्रीपद किंवा महसूल मंत्रीपद दिलं जाण्याची जोरदार चर्चा आहे. अजितदादांना अर्थमंत्रीपद देण्यास शिंदे गटाने जोरदार विरोध केला आहे. तर महसूलमंत्रीपद देऊन भाजपला राधाकृष्ण विखेपाटील यांची नाराजी ओढवून घ्यायची नाहीये. त्यामुळे भाजप कात्रीत सापडला आहे. मात्र, असं असूनही भाजपने ममोठा निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे.

    राज्यातील शिंदे सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे गृह, ऊर्जा आणि अर्थखाते आहे. फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्पही मांडला आहे. मात्र, या युतीत आता तिसरा भिडू दाखल झाला आहे. तो म्हणजे अजित पवार. अजित पवार 40 आमदारांना घेऊन युतीत आले आहेत. त्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. इतर आठ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. अजितदादांना भाजपकडचीच खाती देण्यात येणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्याकडचं मोठं आणि तुल्यबळ असलेलं अर्थमंत्रीपद अजित पवार यांना देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्याला शिंदे गटाने विरोध केला होता.

    मात्र, भाजपने शिंदे गटाचा हा विरोध धुडकावून लावून अजित पवार यांना अर्थमंत्रीपद दिल्याचं दिसून येत आहे. तसे संकेतच मिळत आहे. राज्य सरकारने एक जीआर जारी केला आहे. 7 जुलै 2023चा हा जीआर आहे. विदर्भ, मराठावाडा, उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक ग्राहकांना वीजदरात सवलत देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ सुधारित उपसमिती स्थापन करण्यासाठीचा हा जीआर आहे. या जीआरद्वारे ही उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करणअयात आली आहे. एकूण पाच सदस्यांची ही समिती आहे. या समितीत सुधीर मुनगंटीवार यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मुनगंटीवार यांच्या नावापुढे कंसात वनमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या नावापुढे उद्योग मंत्री आणि अतुल सावे यांच्या नावापुडे सहकार मंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावापुढे ऊर्जा मंत्री उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या नावापुढे अर्थमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला नाही. या जीआरमध्ये पाच सदस्यांच्या यादीत फडणवीस यांच्यानंतर एक पद रिक्त ठेवलं आहे. त्यात फक्त अर्थमंत्री असा उल्लेख केला आहे. अर्थमंत्र्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. अर्थखातं फडणवीस यांच्याकडे असतानाही फडणवीस यांचा उल्लेख त्या रिक्त नावात करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्थमंत्रीपद अजित पवार यांनाच देण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र, अर्थमंत्रीपद अजितदादांकडेच जाणार असल्याने शिंदे गटाच्या आमदारांकडे पाहत राहण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नसल्याचंही स्पष्ट होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.