धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदेड येथील शेकडो युवा कार्यकर्ते व जेष्ठ नागरिकांनी केला पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करीत नांदेड ते घुरखेडा रस्त्यासाठी नागरिकांकडून निवेदन देखील देण्यात आले आहे.
जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आज नांदेड ते बोरखेडा चार किलोमीटर रस्त्यासाठी युवा सेना व नांदेड गावातील नागरिकांनी निवेदन दिले रस्ता पूर्वी कधीच झालेला नाही आणि गावातील दिन दलित दुबळे आदिवासी मागास असे ५० टक्के लोकांचे वहिवाट रस्त्याने आहेत रस्त्याभावी ते लोक शेती करण्याचा समर्थ आहे बेरोजगारीचे प्रमाण वाढले लोकांना रोजगार नाही जर हा रस्ता झाला तर नांदेड गावाच्या अर्ध्या लोकांचे रोजगाराचे प्रश्न कायमची सुटतील म्हणून आज युवा सेनेचे उपतालुकाध्यक्ष भरत.सैदाने ,उपजिल्हा संघटक भैय्या मराठे सर. नितीन पाटील बोरगाव , मागासवर्गीय सेनेचे विभाग प्रमुख संजय मोरे, मागासवर्गीय शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, युवा सेना शाखा अध्यक्ष गोकुळ सैंदाणे, उपशाखा अध्यक्ष लखीचंद सैंदाणे, शेतकरी सेनेचे उपशाखा अध्यक्ष दत्तू कोळी, भटू सैंदाणे, अजीम मणियार, रमेश कोळी, रघुनाथ कोळी, दगा कोडी, दिलीप कोळी, प्रकाश भोई, बाळू कोळी, आणि नांदेड गावातील सत्संगी मंडळ, असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश सुद्धा झाला.