जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम काॅलनीत एका बांधकामावरून दोन गटात वाद झाल्याने रविवारी दुपारी तुफान दगडफेक झाली. यावेळी दोन्ही गटाचे दोनशे-अडीचशे तरुण समोरासमोर आले होते. दगडफेकीत ५ जण जखमी झाले असून, दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलिस कुमक तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी रात्री दहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तसेच कोणालाही अटक केली नव्हती.
काही तरुण व महिलांनी लहान मुलांना मारहाण केल्यावर वाद सुरू झाला. हे समजताच मोठ्या संख्येने तरुण जमा झाले आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर दंगानियंत्रण पथक, चार्ली यंत्रणा व शहरातील सर्व पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या. अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाण्याची डीबी टीम घटनास्थळी दाखल झाली. दंगानियंत्रण पथकाने परिसरात पथसंचलन केले. दगडफेकीत पाच जखमी दगडफेकीत रवींद्र राठोड, समाधान राठोड, साजन राठोड, पवन पाटील, दीपक घुगे व श्रीकांतसिंग चाैधरी हे जखमी झाले. घटनेनंतर तरुणांना महिलांनी मारहाण केल्याची माहिती मिळाल्यावर दुसऱ्या गटाच्या ६० महिला थेट एमआयडीसी पोलिस ठाण्यात धडकल्या. त्यांनी मारहाण करणाऱ्या महिलांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी तरुणही मोठ्या संख्येने होते.