लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: ग्रामीण भागातील एक युवक वृत्तवाहिनी क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करून भरारी घेऊ शकतो हे आज लाइव्ह महाराष्ट्र संपादक मी आपल्या कामातून संपूर्ण जळगाव जिल्ह्याला दाखवून दिलेले आहे त्यांनी सुरू केलेल्या या चॅनलला शुभेच्छा देत सदर चे चैनल संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू व्हावेत अशा शुभेच्छा दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.
लाईव्ह महाराष्ट्र चॅनल च्या वतीने आज दिवाळी अंकाचे प्रकाशन छोटेखानी कार्यक्रमात अजिंठा विश्रामगृह येथे पार पाडले यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना गुलाबराव पाटील म्हणाले की ग्रामीण भागातील युवक गेल्या वर्षभरापासून मोठ्यात धडाडीने एक चायनल सुरू करतो या चैनल च्या माध्यमातून भविष्यात दीनदुबळ्यांच्या समस्या जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या प्रकल्प तसेच चांगल्या बातम्या प्रसिद्ध व्हावे या शुभेच्छा माजी पालकमंत्र्यांनी दिल्या.
तर मार्गदर्शन करताना माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र लाईव्ह ने समाजातील अनेक वृत्त प्रसिद्ध केले यात महत्त्वाचे म्हणजे समाजाला उपयोगी पडतील असेच उत्तान वर जास्त भर देण्यात आलेला आहे सामान्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि पारदर्शक असे काम महाराष्ट्र लाईट च्या वतीने करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी रेखांकित केले.
याप्रसंगी धरणगाव नगरपरिषदेचे गटनेते विनय ( पप्पू ) भावे, स्विकृत नगरसेवक राजेंद्र महाजन, ग्रंथालय सेल जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, अँड कुणाल पवार, युवा उद्योजन वाल्मिक पाटील, प्रशांत देशमुख, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अरविंद देवरे आबा, माजी उपसभापती डी.ओ. पाटील, माजी पं.स.सभापती मुकुंद नन्नवरे, युवा सेना तालुका प्रमुख पवन पाटील, सामाजिक कार्यकर्ते विक्रम पाटील, साईभक्ती मेसचे संचालक जगदीश माळी, किशोर पाटील, गोलू माळी, भूषण पाटील, अविनाश माळी, तुषार माळी तसेच लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चे संपादक विजय पाटील, उपसंपादक गौरव पाटील, प्रतिनिधी लक्ष्मण पाटील सर, प्रविण पाटील तसेच लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ची संपूर्ण टीम यांची उपस्थिती होती.