धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यात तहसील कार्यालयाला तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तालुका परिसरात वाळू माफियांविरुद्ध मोठी कारवाई सुरु केल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. नुकतेच नांदेड गावाजवळ ठिकठिकाणी साठवून ठेवण्यात आलेले तब्बल शंभर ब्रास वाळूसाठे जप्त केल्यानंतर आज दुसरी कारवाई मौजे बांभोरी परिसरात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील मौजे बांभोरी प्र.चा अवैध ९० ब्रास वाळू साठा धरणगाव महसूल विभागाच्या पथकाने जप्त केला असून सदरची वाळू जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहे. हि कारवाई तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप मोरे, नायब तहसीलदार महसूल अमोल पाटील, मंडळ अधिकारी पाळधी गजानन बिंदवाल तलाठी बांभोरी प्र चा नारायण सोनवणे कोतवाल यांनी केली आहे.