जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्थानकात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिव कॉलनी परिसरातील गट नंबर ६० प्लॉट नंबर १६२ मधील रहिवासी सुनंदा गिरीश झोपे याच्या घरात दिनांक ७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारापासून ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अनोळखी चोरट्यांनी घराचा दरवाजाला लावलेले कडी व कोयंडा कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील २१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तर ५ हजार रुपये रोकड असा एकूण २६ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सुनंदा झोपे यांनी रामानंद पोलीस स्थानकात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहे.