लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका व दश्मीगव्हाण ग्रामपंचायत यांच्या वतीने दि . ३० शनिवार रोजी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर तालुक्यातील तसेच शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राजकीय- सामाजिक शासकीय, शैक्षणिक, क्रीडा ,अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमावेळी बोलताना तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की कोरोणा काळामध्ये प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांची तारेवरची कसरत पाहावयास मिळत होती .ऑक्सिजन पुरवठा रुग्णालयातील बेडची जाणवणारी कमतरता या सर्व गोष्टींमुळे नियोजन करत असताना अधिकाऱ्यांची होणारी धावपळ यातून प्रत्येकाची परीक्षा होत होती, मात्र आज पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुरस्काराने सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे . यातून नक्कीच प्रत्येकाला कामासाठी ऊर्जा मिळेल असे मत व्यक्त केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केडगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष समीर मणियार हे होते, तर प्रमुख उपस्थिती मध्ये ज्येष्ठ पत्रकार मन्सूर शेख व दैनिक नगर स्वतंत्र चे मुख्य संपादक सुभाष चिंधे हे होते, पुरस्कार कर्त्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष अन्सार शेख दशमी गव्हाण सरपंच संगीता कांबळे पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शिवा म्हस्के , सचिव सबिल सय्यद, संजय वायकर, शाम कांबळे ,अशोक तांबे ,रियाज पठाण, आसावरी वायकर, महेंद्र भिंगारदिवे, रफिक शेख ,बाबासाहेब तिपोळे, अमोल डोळस, अँड. अमोल थोरात ,नगर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी- सुनील थेटे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे- सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप ,वाहतूक पोलीस शाखेचे- शशिकांत गिरी, नगर तालुका कृषी अधिकारी पोपट नवले आदि उपस्थित होते .