धरणगाव : प्रतिनिधी
शिवकालीन प्राचीन सारजेश्वर महादेव मंदिराचे सेवेकरी भोले सरकार मित्र परिवार गेल्या काही दिवसांपासून अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला होता. ते श्रीनगर येथे सुरक्षित असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अमरनाथ यात्रा सध्या बंद आहे. हे सेवेकरी गेल्या पाच वर्षांपासून नियमित अमरनाथ यात्रेत भगवान अमरनाथ भोले बाबाच्या दर्शनाला जातात. धरणगाव तेथून जळगाव व तेथून अमृतसर रेल्वेने ४० भक्तांचा जत्था अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाला होता. दि. ५ जुलैपासून पहलगाममार्गे पायी जाणार होते. दि. १५ जुलै रोजी परतण्याचे नियोजन होते. परंतु अमरनाथ यात्रा अचानक बंद झाल्याने सारे काळजीत पडले होते.
गेले तीन दिवस त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नव्हता. त्यांच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेतली असता ते अमरनाथ येथून दर्शन घेऊन परत निघाल्यानंतर अमरनाथ यात्रा बंद करण्यात आल्याचे समजले. ते श्रीनगर येथे आले असून श्रीनगरला ते सुरक्षितरित्या थांबले आहेत. मात्र, श्रीनगरपासून पुढे रस्ता बंद झाल्याने त्यांना येणे शक्य झाले नाही. रस्ता मोकळा होताच ते परत येतील, असे सांगण्यात आले.