चोपडा : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून घराकडे पायी निघालेल्या शिक्षिकेच्या गळ्यातील ५१ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र धूमस्टाइल आलेल्या चोरट्यांनी लांबविले. ही घटना रामकुंवरनगरातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री पावणेआठ वाजता दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अज्ञात ज्योती चंदन पवार (४१, रामकुंवरनगर, चोपडा) या शिक्षिका असून, दि. ७ रोजी पावणेआठ वाजता घराकडे पायी येत होत्या. त्यावेळी पाठीमागून विना क्रमांकाच्या दुचाकीवरून धूमस्टाइल आलेल्या २० ते २५ वयोगटातील चोरट्यांनी १७ ग्रॅम वजनाचे व ५१ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लांबविले. शिक्षिकेने आरडाओरडा केला. मात्र, तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. तपास सहायक निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.