मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीला फोडून अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत सत्तेत बसल्यानंतर शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघाले असून आज त्यांची सभा छगन भुजबळ यांच्या मतदार संघात आहे तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार पावसात भिजल्याचा एक फोटो ट्विट केला आहे, यात तेरे हर एक वार का पलटवार हू…… असे कॅप्शन दिले आहे. शरद पवार यांच्या या फोटोमुळे सातारा लोकसभेला जसा उदयनराजेंचा लोकसभेला पराभव झाला तसा पराभव छगन भुजबळांचा होणार असे जितेंद्र आव्हाड यांना सूचवायचे नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान शरद पवार आज छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात प्रचार करण्यासाठी आले होते. यावेळी शरद पवार पावसात भिजले. त्यांच्यासोबत या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी हा फोटो पोस्ट करत 2019 मध्ये जसे वातावरण फिरले होते तसेच वातावरण येणाऱ्या निवडणुकीत बदलणार असल्याचा इशारा, अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या छगन भुजबळ यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून अजित पवार बंडखोर आमदारांना घेऊन सत्ते सहभागी झाले. एवढेच नाही तर त्यांनी थेट पक्ष आणि चिन्हावरही दावा ठोकला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिले आहे.पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असल्याचे पत्र आमदारांच्या सह्यांसह निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षात सध्या अजित पवार आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे पक्षसंघटनेवरील पकड मजबूत करण्यासाठी शरद पवार थेट मैदानात उतरले असून त्यांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे.