• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

…तर राजकीय करिअर संपवण्याचा डाव – पंकजा !

editor desk by editor desk
July 8, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
…तर राजकीय करिअर संपवण्याचा डाव – पंकजा !

मुंबई : वृत्तसंस्था 

2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते, त्या निवडणुकीत माझा पराभव झाला. मात्र, त्या नंतर अनेक वेळा मला संधी दिली गेली नाही, अशा बातम्या झाल्या. मात्र, मला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. अनेकांनी मला ऑफर दिल्याच्या बातम्या आल्या, त्याकडेही मी गांभीर्याने पाहिले नाही. असे म्हणत माझे राजकीय करिअर संपवण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. पाठित खंजीर खुपसण्याचे माझ्या रक्तात नसल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.
राहुल गांधी यांना प्रत्यक्षात समोरा-समोर मी आजपर्यंत पाहिले नाही. सोनिया गांधी आणि मी भेटलेले नाही. मी लपून छपून काम करत नाही. मी कोणताही निर्णय मी लपून घेत नाही, जो निर्णय घेईन तो उघडपणे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काही माध्यमांनी माझ्या बाबत खोटी माहिती दाखवली. मी शपथेवर सांगते की, मी गांधी परिवारला वैयक्तिक ओळखतही नाही. त्यामुळे चूकीची माहिती देणाऱ्या माध्यमांविरोधात मी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा बातम्या देणाऱ्या माध्यमांवरही त्यांनी टीका केले.
पुढील एक ते दोन महिने मी ब्रेक घेणार आहे. तसेच अंतर्मुख होऊन विचार करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. माझ्या पक्षाला माझ्या बद्दल सन्मान वाटला असेल, माझ्यासाठी पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असून त्या लवकरच पक्षांतर करतील, अशा चर्चा रंगल्या होत्या. या संदर्भात राज्यात नव्याने दाखल झालेल्या बीआरएस पक्षाने त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. तर पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर आम्हाला आनंदच होईल, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले होते.
तसेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी देखील काँग्रेस पक्ष पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यास इच्छुक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, या सर्व शक्यता त्यांनी फेटाळल्या आहेत.

Previous Post

चौघांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ; खुनाचा गुन्हा दाखल !

Next Post

भुसावळात गावठी पिस्टल विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात !

Next Post
भुसावळात गावठी पिस्टल विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात !

भुसावळात गावठी पिस्टल विक्री करणारे पोलिसांच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जमत असेल तर उपोषण सोडा ; मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू नाराज !
कृषी

जमत असेल तर उपोषण सोडा ; मंत्री बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू नाराज !

June 12, 2025
नाना पटोलेंचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला ; मंत्री बावनकुळे !
राजकारण

नाना पटोलेंचे मन आणि मेंदू भ्रष्ट झाला ; मंत्री बावनकुळे !

June 12, 2025
चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .
Uncategorized

चाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता .

June 12, 2025
खळबळजनक : अहमदाबादवरुन लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !
क्राईम

खळबळजनक : अहमदाबादवरुन लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळले !

June 12, 2025
जिल्ह्यात वादळाचा कहर : शेतकऱ्यांचे मोठे नुकसानासह तीन ठार !
क्राईम

जिल्ह्यात वादळाचा कहर : शेतकऱ्यांचे मोठे नुकसानासह तीन ठार !

June 12, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

हॉटेलच्या बिलावरून वाद : चौघांनी केली बेदम मारहाण !

June 12, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group