एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात जुनी खुन्नस ठेवून झालेल्या वादातून मारहाणीत एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जखमी झाला आहे यावेळी रवंजे येथे स्थानिक पोलीस व सीआरपी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सदर घटने कामी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रवंजे या गावी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दुचाकीचा कट लावण्यावरून वाद झाला व यापूर्वीच्या वादाची खुन्नस डोक्यात ठेवून चौघा संशयितांनी नामदेव कोळी या तरुणाला बेदम मारहाण केली. संशयितांनी तोंडावर व शरीरावर जोरदार मारहाण केल्याने त्यास बेशुद्धावस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक सतीश गोराडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.तालुक्यातील रवंजे येथील २० वर्षीय तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी रवंजे येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ घडली. नामदेव अशोक कोळी (२०, रवंजे, ता. एरंडोल) असे मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार संशयितांविरोधात एरंडोल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने एरंडोल तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे, चौघा संशयिताने ताब्यात घेतले. या खून प्रकरणी एरंडोल पोलिसांनी लक्ष्मण गणपत माळी (४३), आकाश सोमा कोळी (२७), राजेंद्र सुकदेव महाजन (४०), सुकलाल ईश्वर माळी (३७, सर्व राहणार रवंजे, ता.एरंडोल) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयितांना एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यावेळी अप्पर पो.अ. गवळी उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर यांनी भेटी दिल्या असून यावेळी स्थानिक पोलिसां सह सी आर पी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.