Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेता मिथुन चक्रवर्तीना मातृ शोक !
    राज्य

    अभिनेता मिथुन चक्रवर्तीना मातृ शोक !

    editor deskBy editor deskJuly 7, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची आई शांतिरानी चक्रवर्ती यांचं निधन झालं आहे. मिथुन यांचा धाकटा मुलगा नमाशीने ही माहिती दिली. मिथुन यांचे वडील बंसत कुमार चक्रवर्ती यांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं होतं.

    आता त्यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्रही हरपलं आहे. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनविश्व आणि राजकीय जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या आईच्या निधनाचं वृत्त कळताच तृणमुल कॉंग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोशल मीडियावर शओक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले, ‘मिथुन चक्रवर्ती यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. भगवान मिथुन दा आणि त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्यासाठी बळ देवो.’

    अभिनेते मिथुन सध्या ‘डान्स बांगला डान्स’ च्या १२ व्या सिझनमध्ये जज आहेत.या शो संबंधित लोकही त्यांच्या दु:खात सहभागी झाले आहेत. त्यांच्या करिअरचा सुरुवातीचा काळ खूपच संघर्षमय होता. तेव्हा ते आईवडील आणि बहीण भावांसोबत राहत होते. ते एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात वाढले. ते नेहमी सांगतात की माझ्या आईवडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले.

    #mithunchakrvarti
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.