पण अमळनेरला सभेचे आयोजन योजन का नाही ?
जळगाव – राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आता मैदानात उतरले आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवार आपली शक्ती वाढविण्यासाठी येणार असून त्यांची पारोळा, मुक्ताईनगर आणि धरणगावात सभा होणार आहे. अशी माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, ते लवकरच आपला राज्यव्यापी दौरा सुरू करणार आहेत. याच दौऱ्याच्या अंतर्गत ते जळगाव जिल्ह्यात येणार असल्याचे नुकतेच निश्चीत झाले होते. या दौऱ्यात दोन सभांचे स्थळ मात्र ठरले नव्हते. यावर शिक्कामोर्तब झाले असून शरद पवार हे ९ रोजी पारोळा, १० रोजी मुक्ताईनगरसह धरणगाव या तीन ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी लाईव्ह महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे.
शरद पवार हे ९ जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या दिवशी सायंकाळी सहा वाजता त्यांची सभा पारोळा येथे होणार आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १० जुलै रोजी दुपारी दोन वाजता तालुका क्रिडा संकुलाच्या मैदानावर सभा होणार आहे. या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्ह्यातील नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आज सकाळपासूनच या मैदानावर साफसफाईचे काम सुरू झाले आहे.
अमळनेरला सभा का नाही ?
जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथील एकमेव राष्ट्रवादीचे असलेले आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अजित पवारांसोबत गेले आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडले आहे. पारोळा येथे सतीश पाटील यांची बरापैकी ताकद आहे. धरणगाव येथे गुलाबराव देवकर हे आधीपासूनच राष्ट्रवादीचा प्रचार व प्रसाराला लागलेले आहे. मुक्ताईनगर येथे एकनाथराव खडसे त्यांचा दबदबा आहे. तरी या ठिकाणी शरद पवारांच्या सभा च्या आयोजन केले आहे. मात्र तिथे खिंडार पडले आहे तेथे मात्र सभेचे आयोजन न केला असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहे.
शरद पवार देणार मास्टर स्ट्रोक?
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरले असून फुटलेले नेते छगन भुजबळ यांच्यात मतदारसंघात शरद पवार यांची सभा होणार आहे. त्यामुळे शरद पवार आता ॲक्शन मोडमध्ये आलेले असून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा विरोधकांना मास्टर स्ट्रोक देणार असल्याचे बोलले जात आहे.