मुंबई : वृत्तसंस्था
आज राष्ट्रवादी कुणाची यावर दोन्ही गटाच्या नेत्यांनी बैठक बोलविली असतांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाभूकंप झाल्यानंतर आज कुणाकडे किती आमदार, याचा सोक्षमोक्ष होणार आहे. अजित पवार यांच्याकडे विधानसभेचे ४२ आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शरद पवार यांच्याकडे ११ आमदार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार पुढे येतंय.
प्रत्यक्षात कुणाकडे किती संख्याबळ हे १२ वाजेपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान, शरद पवार गटाची बैठक ज्या वाय.बी. सेंटरमध्ये होत आहे तिथे सुप्रिया सुळे दाखल झालेल्या आहेत. सुप्रिया सुळे येताच पत्रकारांनी त्यांना घेरलं. यावेळी सुप्रिला सुळे यांनी पत्रकारांना बाजूला जावून थांबण्याची हात जोडून विनंती केली. वाय. बी. सेंटरमध्ये दुसऱ्याचा भाड्याचा कार्यक्रम असल्याने बाकीच्या भाडेकरुंना त्रास होऊ नये, यासाठी बाजूला थांबा, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, वाय.बी. सेंटरमध्ये आमदार दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाची एक बैठक देवगिरी निवासस्थानी सुरुय. त्या बैठकीनंतर एमईटी कॉलेज येथे त्यांच्या गटाची बैठक होत आहे.