प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील पथराड तालुक्यात कृषी विभाग धरणगांव व आत्मा अंतर्गत रब्बी हंगामाच्या पूर्व नियोजनाबाबत किसान गप्पागोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बीटीएम आत्मा दीपक नागपुरे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ पाटील, प्रमुख अतिथी म्हणून गावचे सरपंच प्रवीण पाटील, तालुका कृषि अधिकारी किरण देसले, कृषी विज्ञान केंद्र शास्त्रज्ञ बाहेती सर, क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी लोटन पाटील, ऍडव्हान्टा कंपनी प्रतिनिधी पवार साहेब, आत्मा बिटीएम दीपक नागपुरे, तंत्र सहाय्यक राजेंद्र लोहार , कृषि सहाय्यक गजानन मोरे, अक्षय लोहार, मनोज पाटील, गजानन पाटील, सतीश बोरसे, राजेंद्र लंके व गावातील समस्त शेतकरी वर्ग उपस्थित होते सदरील कार्यक्रमात बाहेती सरांनी रब्बी हंगामातील बियाण्यास करावयाच्या बीज प्रक्रिया व त्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी समस्त शेतकर्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेणे बाबत मार्गदर्शन केले. क्रिस्टल कंपनी प्रतिनिधी लोटन पाटील यांनी मका पीक व्यवस्थापन व फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.